ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांचा उलवे येथील भूमिपुत्र भवन येथे दिमाखदार सोहळ्यात नागरी सत्कार करण्यात आला. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था, शेलघर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राजकारण, समाजकारण आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर , ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचीही विशेष उपस्थिती होती.
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र घरत यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी पद्मश्री ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांच्या अष्टपैलू अभिनयाची आणि रसिक प्रेक्षकांच्या मनातील त्यांच्या अढळ स्थानाची प्रशंसा केली.
हा नागरी सत्कार समारोह अतिशय उत्साहाच्या आणि दिमाखदार वातावरणात पार पडला, जो उलवे येथील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला.












Leave a Reply