वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा व जव्हार तालुक्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील चिंचघर गाव आणि जुने जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील गुंडपाडा , ताडपाडा येथे सुरु असलेल्या रस्ते कामांची पाहणी केली .
पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड , जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर , जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे ,यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आदी उपस्थित होते.
वाडा तालुक्यातील चिंचघर गावात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. या पावसामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये , नागरिकांच्या सुरक्षेची आणि मूलभूत सोयीसुविधांची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले.
तसेच पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार तालुक्यातील जुने जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील गुंडपाडा , ताडपाडा येथे सुरु असलेल्या रस्ते कामांची पाहणी करून रस्ते बांधकामाचा दर्जा तपासून घेतला. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी कामाच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे … असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले .











Leave a Reply