Namo Yuva Run | पनवेलमध्ये “नमो युवा रन”चे भव्य आयोजन – स्वस्थ व नशामुक्त भारतासाठी युवा शक्तीचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने “स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी” या उद्दिष्टाने आज (दि. २१) पनवेलमध्ये “नमो युवा रन”चे भव्य आयोजन करण्यात आले. या धावस्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात धावपटूंनी ‘फिट इंडिया’चा नारा देत व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.

ही धावस्पर्धा वडाळे तलाव येथून सुरू होऊन तीन किलोमीटर अंतरावर पार पडली. उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, राजेश भगत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, डॉ. सुरेखा मोहोकर, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, संजय भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, आदींसह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेत्यांचा गौरव

  • स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • पुरुष गटात : राज भगत (प्रथम), सुहास माळी (द्वितीय), विकास ठिकडे (तृतीय)
  • महिला गटात : जान्हवी चोगले (प्रथम), प्रथमा भगत (द्वितीय), काजळ प्रजापती (तृतीय)

युवा शक्तीच्या या सहभागाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. युवक, युवती व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी झुम्बा सत्रही आयोजित करण्यात आले होते.

या उपक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नशामुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. “नमो युवा रन” अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही आणि यशस्वी वातावरणात पार पडली.

“देशाचे लोकप्रिय व कणखर नेतृत्व नरेंद्र मोदीजींनी देशाला ‘फिट इंडिया’ आणि ‘ड्रग फ्री इंडिया’कडे नेण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आजच्या युवकांनी समाजाला योग्य दिशा देणे हे आपले कर्तव्य आहे. ‘नमो युवा रन’ हा त्याच उद्दिष्टाचा भाग आहे.” – आनंद ढवळे, अध्यक्ष- युवा मोर्चा, उत्तर रायगड जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *