सार्वजनिक सुविधांच्या भूखंड वापराबाबत धोरण जाहीर करा; माजी नगरसेवक विशाल डोळस यांची मागणी

Vishal Dolas Demands Clear Policy on Use of Public Amenity Plots

नवी मुंबईतील सार्वजनिक सुविधा भूखंडांच्या (Amenity Plots) वापरात होत असलेल्या बदलांबाबत माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीडी बेलापूर Sector-15 येथील प्लॉट क्र. १५ व १६ तसेच Sector-46A मधील प्लॉट क्र. ५ व ५A संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांनी थेट बोट ठेवले आहे .

पत्रकार परिषदेत बोलताना विशाल डोळस यांनी स्पष्ट केले की, “आमचा विरोध कोणत्याही विकास प्रकल्पाला अथवा शहराच्या विकासाला नक्कीच नाही. मात्र, आमची हि ठाम मागणी आहे कि , संबंधित भूखंड हस्तांतरण व Change of Use ची सखोल चौकशी व्हावी, यामागील संपूर्ण निर्णयप्रक्रिया पारदर्शक करून ती सार्वजनिक केली जावी, भूखंड वापरातील बदलाबाबत स्पष्ट धोरण जाहीर केले जावे आणि नवी मुंबईच्या मूळ विकास आराखड्याचे व नियोजनाचे संरक्षण केले जावे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *