Krishnaraaj Mahadik | Navi Mumbai | MPSC Exam – ऑनलाइन परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन

Krishnaraaj Mahadik | Navi Mumbai | MPSC Exam - ऑनलाइन परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन

सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची भेट घेतली.

यावेळी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, वार्षिक परीक्षा वेळापत्रक वेळेत जाहीर करणे, ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन सुपूर्द करण्यात आले.

मीडियाशी बोलताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले कि , विद्यार्थ्यांच्या हितांचे रक्षण व्हावे आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या दृष्टीने ही बैठक सकारात्मक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *