Vikas Zanjad | NMMT बैठकीत महत्त्वाचा निर्णय – परिवहन कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखांचे मेडिक्लेम कवच मंजूर

Vikas Zanjad | NMMT बैठकीत महत्त्वाचा निर्णय - परिवहन कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखांचे मेडिक्लेम कवच मंजूर

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात परिवहन समितीचे सभापती विकास झंझाड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विषयपत्रिकेवरील विविध विषयांबरोबरच परिवहन उपक्रम अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेल्या साडेचार महिन्यांत सभापती विकास झंझाड आणि परिवहन समिती सदस्यांच्या पुढाकारातून कामगारांची वेतनवाढ, ताफ्यात नव्या सीएनजी बसेसचा समावेश यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याच मालिकेत आजच्या बैठकीत कामगारांच्या हिताचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत सभापती विकास झंझाड यांनी माहिती दिली. ते म्हणले कि ,आज झालेल्या बैठकीत कामगारांसाठी असलेले ३ लाख रुपयांचे मेडिक्लेम संरक्षण वाढवून ५ लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही योजना प्रत्यक्षात लागू होईल. या निर्णयाचा लाभ सुमारे २,१०० ते २,२०० कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार असून, त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.”

पुढे ते म्हणले कि , परिवहन उपक्रम अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी समितीकडून सातत्याने विविध निर्णय घेतले जात आहेत. नव्या सीएनजी बसेसचा ताफ्यात समावेश, कामगार कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि सेवा सुधारण्याच्या उपाययोजनांमुळे नवी मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात प्रवाशांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *