ऐरोली विभागात एकाच दिवशी 13 अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

ऐरोली विभागात एकाच दिवशी 13 अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत आज 13 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत केलेल्या जाहीर आवाहनाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे आणि अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आजच्या तोडक मोहिमेप्रसंगी आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली विभागातील या धडक कारवाईप्रसंगी उपस्थित होते.  

अॅड. किशोर शेट्टी यांनी कोर्टात दाखल केलेल्या पीआयएल अवमान याचिका सीपी/685/2025 मध्ये अनधिकृत विनापरवानगी इमारतींची छायाचित्रे सादर केलेली आहेत. या छायाचित्रांमध्ये नमूद अनधिकृत इमारतींना जी – ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. त्या अनुषंगाने आजची तोडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये  –

(1) मनोज कुमार झा, रो हाऊस क्रमांक 20, से-02, अभिलाषा सोसायटी, ऐरोली,

(2) मोहम्मद मुबीन, सी-552, से-02, ऐरोली,

(3) सुनील नवरे, रो-हाऊस नं-10, से-2 बी, ऐरोली,

(4) संतोष सुखदेव प्रसाद, घर क्र. 95/97, गल्ली क्र. 5, शिवकॉलनी, से-01, ऐरोली

(5) संजयकुमार दुबे, रो-हाऊस नं-118, से-2 बी, ऐरोली,

(6) संजयकुमार दुबे, रो-हाऊस नं-119, से-2 बी, ऐरोली,

(7) संजयकुमार दुबे, रो-हाऊस नं-120, से-2 बी, ऐरोली,

(8) भिमराव पाटील, जी-81, से – 03, ऐरोली,

(9) मालमत्ताधारक, जी-166, से-03, ऐरोली,

(10) विनीत विनय सिंह, रो-हाऊस नं. 10, प्रिती सोसा., से-2 सी, ऐरोली,

( 11) वैभव सदानंद सावंत, रो-हाऊस नं. 11, प्रिती सोसा., से-2 सी, ऐरोली,

(12) दिनानाथ धर्मराज यादव, रो-हाऊस नं 12, प्रिती सोसा., से-2 सी, ऐरोली,

(13) अवधुत लक्ष्मण पवार, रो-हाऊस नं. 13, प्रिती सोसा., से-2 सी, ऐरोली

ही 13 अनधिकृत बांधकामे येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सुरुवात केली होती. संबंधितांना कलम 54 अन्वये बजाविण्यात आलेल्या नोटिशीस अनुसरून त्यांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे गरजेचे होते मात्र तसे न केल्याने तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकामे अंशतः निष्कासित करण्यात आली.

या धडक मोहिमेसाठी आठही विभागांचे विभाग अधिकारी तथा आयुक्त उपस्थित होते. जी- ऐरोली विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी – कर्मचारी यांनी 1 जेसीबी, 1 पोकलन, 36 मजूर, 11 ब्रेकर, 15 घण, 3 गॅस कटर आणि 9 जनरेटर सेट वापरून ही तोडक कारवाई केली. यावेळी अतिक्रमण विभागाकडील पोलीस तसेच स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. यापुढील काळातही अशा प्रकारच्या तीव्र कारवाया सर्वच विभागांमध्ये करण्यात येणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *