Sandeep Naik | Girish Mhatre | क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक २०२६” भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा

Sandeep Naik | Girish Mhatre | क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक २०२६" भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा

कट्टा बॉईज मित्र मंडळ व गिरीश म्हात्रे मित्र मंडळाच्या वतीने नेरूळ गाव येथील बामणदेव झोटिंग देव मैदान येथे ३ दिवसीय “क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक २०२६” भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा शानदार प्रारंभ झाला. नेरूळ गावाचे सुपुत्र आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांच्या विशेष उपलब्धीचा व कार्याचा गौरव करण्यासाठी या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनानंतर संदीप नाईक यांनी खेळपट्टीवर उतरून केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनी तरुण खेळाडूंना क्रीडा भावनेने खेळण्याचा सल्ला दिला.

उद्घाटनपर भाषणात बोलताना माजी आमदार संदीप नाईक यांनी गिरीश म्हात्रे यांच्या आजवरच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा गौरव केला. ते म्हणाले कि , गिरीश म्हात्रे यांनी नेहमीच जमिनीवर राहून लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. आज क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती म्हणून मिळालेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. एक सभापती म्हणून ते आपल्या कामाचा ठसा नक्कीच उमटवतील, असा विश्वास देखील संदीप नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

याप्रसंगी भाजपचे नगरसेवक सूरज पाटील , नगरसेवक विनोद म्हात्रे , नगरसेविका सपना गावडे , नगरसेवक सचिन लवटे , युवा समाजसेवक अक्षय पाटील यांच्यासह नेरुळ गावातील ग्रामस्थ , तरुण व क्रिकेट खेळाडू उपस्थित होते . याप्रसंगी गिरीश म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *