नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक जे.डी. सुतार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत खळबळ उडवून दिली. शहरातील विविध विकासकामांना मुदतवाढ देण्यावरून त्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले.
बैठकीदरम्यान मुदतवाढ देण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना जे.डी.सुतार यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
प्रशासनाने मुदतवाढ देण्याची सुपारी घेतली आहे का ? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनातील गोंधळावर बोट ठेवले.
यावेळी स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी देखील सांगितले की, यासंदर्भात प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत












Leave a Reply