नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला अधिक चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. महानगरपालिका मुख्यालय येथे स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्राथमिक शाळांसाठी प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग केवळ पुस्तकात न शिकता प्रत्यक्ष करून पाहता यावेत, यासाठी हे आधुनिक प्रयोगशाळा साहित्य खरेदी केले जाणार आहे. या कामासाठी आलेल्या निविदांपैकी मेसर्स शाईन इंटरप्रायजेस या कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, त्यांना १ कोटी ४० लाख ८ हजार १०८ रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाला आहे. तसेच प्रयोगांच्या प्रत्यक्ष अनुभूतीमुळे विद्यार्थ्यांची विज्ञानाची भीती दूर होऊन त्यांच्यातील संशोधनवृत्ती आणि कल्पकतेला मोठी चालना मिळेल.
याविषयी अधिक माहिती स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी दिली .












Leave a Reply