नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. प्रशासकीय व राजकीय अनुभवाने समृद्ध नेतृत्वाला प्राधान्य देत पक्षाने हा निर्णय घेतल्याचे या निवडीमधून स्पष्ट झाले आहे.
माजी विरोधी पक्षनेते म्हणून महापालिका सभागृहात दशरथ भगत यांनी निर्भीड, ठाम आणि मुद्देसूद भूमिका मांडत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या प्रभागात राबवलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास संपादन केला आहे.
उपमहापौरपदाची जबाबदारी स्वीकारताना शहरासमोरील नागरी, प्रशासकीय व विकासात्मक प्रश्न अनुभवाच्या जोरावर मार्गी लावण्याला प्राधान्य देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या कार्यक्षमतेत अधिक भर घालण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
















Leave a Reply