ऐरोली विभागामध्ये आपल्या सामाजिक व राजकीय कार्यांचा ठसा उमटवणारे माजी जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांचे काम हीच त्यांची खरी ओळख आहे. भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका शशिकला सुतार यांचा वाढदिवस नवरात्री उत्सवात आल्यामुळे या दुर्मिळ व शुभ योगाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा केवळ एक वाढदिवस न राहता, सामाजिक बांधिलकी आणि ‘नारी शक्ती’चा सन्मान करणारा उत्सव बनला.
सकाळच्या सत्रात समतानगर येथे रहिवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलकुंभ ऑपरेटर रूमचे उद्घाटन माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच, ऐरोली सेक्टर-२ येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात माजी जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १२ मधील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. याठिकाणी केक कापून अनेक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शशिकला सुतार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सायंकाळच्या सत्रात, शिवप्रेमी मित्र मंडळ आणि अनंत प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सवात अनंत सुतार आणि शशिकला सुतार यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.याप्रसंगी संपूर्ण सुतार परिवार उपस्थित होता .
तद्नंतर शशीकला सुतार यांच्या वतीने महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यात महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू करत वाण आणि भेटवस्तू वाटप केले.
याचवेळी सुतार दाम्पत्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १० येथील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमांसोबतच माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा देखील दिमाखदारपणे पार पडला. उत्कृष्ठ गरबा नृत्य सादर करणाऱ्या लहान मुलांपासून ते मोठ्या महिला व पुरुष विजेत्यांना सुतार दाम्पत्यांच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे, तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमांना सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभागातील जेष्ठ नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुतार दाम्पत्याने सामाजिक आणि राजकीय कार्याचा समन्वय साधत हा संपूर्ण सोहळा यशस्वीरित्या संपन्न केला.ज्यामुळे हा सोहळा अत्यंत प्रेरक आणि संस्मरणीय ठरला.














Leave a Reply