राज्यपाल जिष्णु देव वर्मा तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना ‘आयुष्यमान कार्ड’ व आरोग्य रक्षणासाठी पीपीई किट देण्यात आले

महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानांतर्गत कचरा वेचक महिलांसाठी फाईन आर्ट सोसायटी चेंबूर मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मोफत #आरोग्य तपासणी शिबीर व ‘नमस्ते’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना ‘आयुष्यमान कार्ड’ व आरोग्य रक्षणासाठी पीपीई किट देण्यात आले.

कार्यक्रमाला कचरा वेचक महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत असलेल्या सुशीला साबळे, नगर सेविका व प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशा मराठे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा, ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे देवनार परिसरातील कचरा वेचक महिला आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *